दुसऱ्या दिवशीही निरा खोऱ्यात पावसाची दमदार बॅटिंग
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेली एक महिना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता, आज दि २६ रोजी पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
२ जून नंतर पावसाने ओढ दिल्याने अनेक तालुक्यामधून पेरणीची कामे खोळंबली होती, मात्र लागोपाठ दोन दिवस पाऊस झाल्याने पेरणीची आणि आडसाली ऊस लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिवनदायनी असलेली नीरा नदी व नदीवरील धरणांची आजची स्थीती समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मागील दोन दिवसांपासून यामध्ये खो-या पाऊस पडू लागला आहे. आज २६ जून पहाटे पासून पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. तर सायंकाळी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली.
COMMENTS