नारोळीतील येथील रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील नारोळी येथील रुग्णाचा करोना चाचणी आहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जिव भांड्यात पडला आहे. मात्र ससुन रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडुन पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याने तालुक्यातील प्रशासनाची गुरुवारी ( दि. २५ ) पुरती भंबेरी उडाली.
मागिल चार ते पाच दिवसापासुन नारोळी येथील एक रुग्ण ससुन रुग्णालयात उपचार घेत आहे. यावेळी या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ची लिस्ट तयार करण्यात येते. त्यावेळी निगेटिव्ह रिपोर्ट असतानाही चुकुन पॉझिटिव्हच्या लिस्टमध्ये गेला. त्यानंतर आज ससूनमधील डॉक्टरांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेल्या यादीत नारोळीचे नाव आले.
त्यामुळे रुई येथील ग्रामिण रुग्णालय, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी आदींना नारोळी येथील रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनासह आरोग्य विभागाची पुरती भंबेरी उडाली. त्यानंतर बारामती प्रशासनाकडुन आमच्याकडे रिपोर्ट पाठवा अशा सुचना ससूनला देण्यात आल्या. यावेळी ससूनमधील आरोग्य विभागाने यादी पाहिली असता रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितल्यावर प्रशासन व आरोग्य विभागाने एकच सुस्कारा सोडुन सर्वांचाच जिव भांड्यात पडला.
.......................................................
COMMENTS