गोपीचंद पडळकरांनी आपल्या कुवतीत रहावे - उत्तम धुमाळ
पुरंदर : प्रतिनिधी
'भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मा.शरद पवार साहेबांबाबत काल जे वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. गोपीचंद पडळकर यांचे जेवढे वय असेल त्याहून अधिक वर्षे पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिली आहेत. ज्यांचे विधान सभेमध्ये डिपॉझिट जप्त झाले त्यांनी पवार साहेबांविषयी बोलणे योग्य नव्हे, आपण थोड जिभेवा लगाम घलावा, भविष्य सांगणा-या पोपटासारखे बोलू नये, पडळकरांची ती कुवत नाही' असा टोला पुरंदर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी लगावला.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय नेते पवार यांच्या संदर्भांत अतिशय हिन शब्दात वक्तव्य केले आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहेत. जेऊर (ता.पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिरा समोरील प्रांगणात सोशल डिस्टंसिग व मास्क लावत जेऊर महाविकास आघाडीच्या वतीने गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शामराव धुमाळ, प्रतीक धुमाळ, माऊली धुमाळ, दत्ता धमाळ, राहूल तांबे, संभाजी ठोबरे, गणपत तांबे यांसह राट्रवादी कॅंग्रेसह इतर पक्षांचे सदस्य उपस्थित होते.
राजकारणात मतभेद असू शकतात मात्र एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य करणे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला शोभत नाही. पवार साहेबांचे नाव सर्वच पक्षातील जेष्ठ नेतेही आदराने घेतात. वेळ प्रसंगी त्यांच्याशी सल्लामसलत करतात हे पडळकरांना माहित नसावे. त्यामुळे त्यांनी असे बेताल वक्तव्य पवार साहेबांच्या बाबतीत केले आहे. त्यामुळे पवार साहेबांविषयी तुमची बोलण्याची कुवत नाही. हे आपण लक्षात घ्यावे व येथून पुढे साहेबांच्याबाबत अपशब्द काढल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपणांस योग्य उत्तर देतील हे लक्षात ठेवावे असेही धुमाळ पुढे म्हणाले.
COMMENTS