पुरंदरच्या सोनोरी येथील वृद्ध महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.
तालुक्यात ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील वृद्ध महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज सोमवारी पुरंदर तालुक्यातील सासवड सह इतर गावातील कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या पन्नाशी पार करून ५३ वर गेली आहे.
सोनोरी येथील वयस्कर महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने पुणे औंध येथे शासकीय दवाखान्यात काल पाठविण्यात आले होते. सदर महिलेचा कोरोना अहवाल positive आलेला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यात सासवड सह इतर गावातील पूर्ण रुग्णांची संख्या एक एक ने वाढत आहे. आज सोनोरी येथील एका वृद्ध महिलेची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्ध महिलेला श्वासन स्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना औंध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता तालुक्यातील गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. लोकांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सैरावैरा फिरु नये. विवाह समारंभ थोडक्यात उरकावेत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
COMMENTS