जेजूरीत निष्काळजीपणाचा कळस : बँकेमध्ये बेजबाबदार वर्तनाचा एक उत्तम नमुना
पुरंदर : प्रतिनिधी
जेजुरीतील एका मोठे नाव असलेल्या सरकारी बँकेमध्ये शासकीय योजनेसाठी खाते काढण्यासंदर्भात लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती. यात सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आपल्या सहकाऱ्यांसह तेथे वेळीच पोहोचले व त्यांनी गर्दीवर नियंत्रण करत जमाव पूर्णपणे पांगवला.
आज पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नासी पार केली. ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यातील सासवड सह वेगवेगळ्या गावांमध्ये असून, कोरोना आपल्या जवळ घेऊन ठेपला आहे. शेजारी सासवड मध्ये कोरोना रूग्ण संख्येने चिंता वाढली आहे. प्रश्न असा आहे की लोकांचे वर्तन कधी सुधारणार ? लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजणार आहे का? प्रत्येकवेळेस पोलीस यंत्रणेला अशी वेळ येऊ न देणे. हे पुरंदर तालुक्यातील काप्रत्येक गावातील नागरिकांसह, जेजुरी वासीयांचे कर्तव्य नाही का?
कोरोना रोगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, सर्व नागरिकांनी गर्दी टाळली पाहिजे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडत असताना मास्क वापरला पाहिजे, विनामास्क कोणी आढळून आल्यास कारवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजेच. असे असताना लोक सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळत नाहीत. बॅंक व इतर सरकारी कार्यालयात सर्रास लोक विना मास्क जाताना दिसून येतात. बॅंक व इतर सरकारी कार्यालयात दर्शनी भागात सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे. मात्र कर्मचारी स्वत: जवळ किंवा टेबल वर ठेवतात तोपर्यंत हे लोक इतरत्र आपल्या हाताचा स्पर्श करत असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा असताना कर्मचारी व लोक सर्रास पिचकाऱ्या मारताना दिसत आहेत. आजही सार्वजनिक ठिकाणी घातक माव्याच्या प्लॅस्टिकच्या पुढल्या पडलेल्या दिसतात. गुपचूप घातक मावा व महाराष्ट्र बंदी असलेला गुटखा सर्रास शौकीनांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लोक पिचकाऱ्या मारताना दिसून येत आहेत.
COMMENTS