सासवडचा लॉकडाऊन शिथिल, अटी आणि शर्तींवर जनजीवन सुरळीत होणार.
सासवडच्या १ व खानवडीतील १ रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील सासवड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सासवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विनोद जळक यांनी जनता कर्फ्यू लागु केला होता. आज सोमवारी पुरंदर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत सासवडचा जनता कर्फ्यू मंगळवार पासून शिथिल करण्यात येणार आहे. अटी आणि शर्ती लावून जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सासवड हडको कॉलनी येथील एक व खानवडी येथील एक असे दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल positive आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनलॉक वन सुरू केले. या दरम्यान शहरी भागातील लोक मोठ्या प्रमाणावर गावाकडे येऊ लागले. तसेच नोकरी, धंद्या निमित्त लोक बेफिकीरीने ये-जा करु लागले. त्यामुळे सासवड शहरात १ कोरोनाने मृत्यूनंतर कोरोनाचे एक एक करुन तब्बल ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सासवड शहर कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय की काय अशी भितीदायक परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे सासवड नगरपरिषदेच्या सदस्यांनी निर्णय घेत मुख्याधिका-यांनी सासवड मध्ये जनता कर्फ्यूचे आव्हाण केलं होतं. गेली चार दिवसात लोकांनी जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मात्र शासनाच्या नियमानुसार इतके दिवस असा कर्फ्यू ठेवणे अयोग्य आहे. लोकांना जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नोकरी, कामधंद्या निमित्त लोकांना घराबाहेर पडणे गरजेचे आहे. या लोकांना कर्फ्यू मुळे विनाकारण अडचण निर्माण होत होती.
आज सोमवार दि.२९ रोजी सकाळी अकराच्या सुमारास पुरंदरच्या तहसील कचेरीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी आमदार संजय जगताप तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सासवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन शिथिल करत काही उपाययोजना सुचविल्या आहेत. दुध विक्रेत्यांची दुकाने सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास उघडतील, किराणा मालाचे व इतर अस्थापने सकाळी दहा ते पाच या वेळेत सुरू राहतील, आठवडे बाजार भरणार नाही. दररोज चौक चौकत विभागून भाजिविरक्रेते बसतील. सर्व व्यावसायिकांनी दक्षता घेत सॉनिटायझरचा वापर, गिर्हायीकांनमध्ये सामाजिक अंतर कसे राहील यासाठी प्रयत्न करणे, सर्वांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा असणार आहे, लोकांनी एका ठिकाणी समुहाने जमु नये, वयस्कर व्यक्ती व लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये अशा अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करत आपला व्यावसाय सुरळीत चालू करावेत. आज दुपारी तीन नंतर सासवड हडको कॉलनी येथील एक व खानवडी येथील एक असे दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल positive आले आहेत.
COMMENTS