तळीरामांच्या उच्छादापासून वाघळवाडी वन विभागाचे होणार संरक्षण : रस्त्यावर आता थेट गेट
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे शेकडो एकर वरती वनक्षेत्र विस्तारलेले आहे. वाघळवाडी येथील वन विभागात मद्यपी आणि विकृत मानसिकता असणा-या समाजकंटकांकडून वारंवार आग लावण्याचे प्रकार घडत होते.
त्यामुळे वनपरीसरातील प्राण्यांना आणि झाडांना हानी पोहचत होती. हा सगळा प्रकार लक्षात घेऊन पर्यावरण प्रेम आणि सामाजिक बांधिलकी म्हणून वन विभागाच्या सहकार्याने जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गेट लावण्यात आले.
वन रक्षक नितीन कोकाटे, वन कर्मचारी गायकवाड व फाऊंडेशनचे जिव्हाळा सोशल फाउंडेशन चे सभासद शंतनु फरांदे,संकेत फरांदे,संतोष धुमाळ,प्रथमेश किर्वे,गणेश जमदाडे,गणेश शिंदे,विवेक सरोदे,प्रमोद फरांदे आदि उपस्थित होते.
फाऊंडेशनचे सभासद चंद्रकांत देवकर यांचे विशेष योगदान
देवकर हे बारामती येथे एका कंपनीमध्ये काम करतात पेशाने वेल्डर आहेत .फाऊंडेशनची गेट बसवण्याची संकल्पना त्यांना समजली त्यानंतर त्यांनी आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून लगेच या गेटची वेल्डिंगचे सर्व काम विनामोबदला करून देतो असे सांगत आपले योगदान दिले
COMMENTS