आरोग्य सभापतींच्या गावात एक ही नाही कोरोनाचा रुग्ण : प्रमोद काकडे यांचे बारकाईने लक्ष
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे हे बारामती तालुक्यासह निंबुत गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकडे बारकाईने लक्ष देत आहेत.
ग्रामपंचायत निंबुत मध्ये कोरोना आढावा बैठक नुकतीच पार पाडली. आरोग्य सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, सरपंच राजकुमार बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाली. निंबुत गावामध्ये कोरोना रोगाचा शिरकाव होऊ नये या साठी करावयाचे उपाय योजना संदर्भात मार्गदर्शन प्रमोद काकडे यांनी केले. तसेच गावातील लोकांची नियमित आरोग्य तपासणी करणेसाठी सूचना केल्या व मार्गदर्शन केले. निंबुत गावतील काम करणारं सर्व कर्मचारी यांनी सूचनांचे पालन करून त्या प्रमाने काम करावे व त्या संदर्भात पुढील सभा दि 10 ऑगस्ट रोजी होईल त्यापूर्वी सर्व कुटुंबाना भेटी देऊन तपासणी करावी. अशा सूचनाही आरोग्य सभापती काकडे यांनी केल्या
COMMENTS