निरेत कोरोनाचा पहिला बळी : तालुक्याची मृत्यू संख्या २५ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नुकत्याच कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांचे आज मृत्यू झाले आहेत. नीरा येथील एक वृद्ध महिला व आंबोडी येथील एक वृद्ध पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाले आहेत, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना मृत्यूची संख्या २५ झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील कोरोना बाधित रुग्ण पुरुष (वय ६० वर्षे) तसेच नीरा येथील कोरोना बाधित महिला रुग्ण (वय ६५ वर्षे) यांचे आज निधन झालेले आहे. नीरा येथील प्रभाग ५ मधिल गावापासून दूर असलेल्या वस्तीवरील महिला पुर्वीच एक दुर्ध आजारावर उपचार घेत होत्या. त्यांची नुकतीच कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्या टेस्टचा अहवाल आज शुक्रवारी दि. ३१ रोजी दुपारी पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.
COMMENTS