लोणंदच्या सावित्री हाॅस्पिटल मधे "डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर " सुरू
लोणंद : प्रतिनिधी
मंगेश माने
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथील "सावित्री हाॅस्पिटल " डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर म्हणून दिनांक २९ जुलै पासून परिसरातील कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सत्तावीस बेडस् सह उपलब्ध झाले आहे.
लोणंद येथील सावित्री हाॅस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सावित्री हाॅस्पिटलचे संस्थापक डाॅक्टर संजय शिवदे यांनी माहिती देताना सांगितले की, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील सावित्री हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ सेंटर उभारण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारचे शेखर सिंह यांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेसाठी सावित्री हॉस्पिटल लोणंद हे कोरोना सेंटर म्हणून अधिग्रहित करण्यासाठी डाॅक्टर संजय शिवदे यांनी स्वेच्छेने सावित्री हाॅस्पिटल उपलब्ध करून दिले. त्यासाठी प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तहसीलदार दशरथ काळे तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील यांनी वेळोवेळी भेटी देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. आज लोणंदच्या या सावित्री हॉस्पिटलमध्ये शासनाच्या मार्फत हे "डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर" उभारून कोरोना विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेले असून या माध्यमातून शासनास आवश्यक असणारे सर्व सहकार्य देण्यात येणार आहे .
या उपक्रमाला आयएमए लोणंद निरा शाखेच्यावतीने देखील रूग्णांना सेवा देण्यात येणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी सांगितले. तसेच यावेळी असोसिएशनच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मशीन ही याप्रसंगी भेट देण्यात आली . तर लोणंद मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ मिलिंद काकडे यांनी या केंद्रासाठी असोसिएशनच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब बागवान यांनी वैद्यकिय क्षेत्राबद्दल मोलाचे विचार मांडून लोणंद वासीयांकडून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावित्री हॉस्पिटलचे डॉ संजय शिवदे यांच्यासह विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, उपाध्यक्ष डॉ. दीपक पवार, सचिव डॉ. रोहन रावखंडे, माजी अध्यक्ष डॉ.अनिलराजे निंबाळकर व फिजिशियन डॉ. दीपक गायकवाड, डॉ. दीपक गोरड, डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. नानासाहेब हाडंबर, इनरव्हील अध्यक्षा डॉ.स्वाती शहा, डॉ.विद्याधर शिवदे ,श्रीकृष्ण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिठूभाई पटेल, रोटरी अध्यक्ष विश्वनाथ शानभाग आदी मान्यवर व सभासद डाॅक्टर उपस्थित होते.
COMMENTS