मांडकी पाठोपाठ जेऊर मध्ये कोरोनाच शिरकाव : तालुक्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०४
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरीसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. आज नव्याने जेऊर गावामध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, जेजुरी येथील ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुरंदरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत ५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ५०४ झाली आहे.
जेजुरी येथील चार व जेऊर येथील एक असे एकूण पाच व्यक्तींचे खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे. कालच मांडकी येथील एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी मांडकी शेजारच्या जेऊर गावामध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची आता तारेवरील कसरत होणार आहे.
COMMENTS