सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

नीरा शहरात पुढिल शनिवारी पर्यंत जनता कर्फ्यू : तीन दिवसात ४ रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांचा निर्णय

नीरा शहरात पुढिल शनिवारी पर्यंत जनता कर्फ्यू :
तीन दिवसात ४ रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांचा निर्णय

पुरंदर : 
       पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहरांमध्ये मागील तीन दिवसात एकूण चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलयाने मोठी खळबळ माजली आहे. बुधवारी १ तर आज शनिवारी एकाच कुटुंबातील ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुढील शनिवार १ ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी व्यापारी असोसिएशनने ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती करत पुढील सात दिवस आमची अस्थापणे बंद ठेवणार आहोत व हा जनता कर्फ्यू जाहीर करावा.

        नीरा शहरात मागील तीन दिवसांत एकाच प्रभागात पण वेगवेगळ्या कुटुंबातील ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाजारपेठेच्या दोन भागांमध्ये कंटेनमेंट जाहीर झाला. त्यामुळे या बाजारपेठ निर्धारित वेळेत सुरक्षेचे नियम पाळत अस्थापणे सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र त्यामुळे इतर पेठांनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याचा धोका संभावित धरून सर्व व्यापाऱ्यांनी निर्णय घेत पुढील सात दिवस जनता कर्फ्यू करण्यात आला. यामध्ये सर्व दवाखाने, हॉस्पिटल, टेस्टिंग व पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल, शेतीविषयक दुकाने सुरू राहतील. दुधाची दुकाने सकाळी सहा ते नऊ या वेळेत सुरू राहतील मात्र त्यांनी दुकानाबाहेर दूध विक्री करावी दुकानातील इतर वस्तू विक्रीस ठेवू नयेत, तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी शहरांमधील इतर प्रभागांमध्ये फिरती विक्री करावी. मात्र एका जागेवर बसून भाजी विक्री करता येणार नाही.

    मागील चार महिन्यात कोरोनाच्या दृष्टीने सेफ झोन असलेल्या नीरा शहरात मागील तीन दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे लोकांमध्ये थोडी घबराट निर्माण झाली आहे. बुधवारी प्रभाग क्र. दोन मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत प्रशासन व व्यापाऱ्यांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू केला होता. उद्या रविवारपासून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न होता. मात्र शनिवारी संध्याकाळी पुन्हा प्रभाग क्रमांक दोन मधीलच बारामती रोड वरील एकाच कुटुंबातील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे वास्तविक प्रभाग क्रमांक दोनच फक्त कंटेनमेंट झोन होने अपेक्षित होते. म्हणून पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे याच प्रभागा मधील दळणवळण व्यवस्था रोखत निर्धारित वेळेत अस्थापने सुरू ठेवण्यात येणार होती व गावातील इतर प्रभागातील आस्थापने (दुकाने) व इतर व्यवहार सुरू ठेवण्यात येणार होती.

      मात्र व्यापाऱ्यांनी आपली असथापणे या परिस्थिती उघडण्यास असमर्थता दर्शवली व ग्रामपंचायत प्रशासनाला तशी विनंती केली. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शिंदे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, दीपक काकडे, सदस्य अनिल चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, हरिभाऊ जेधे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, भाऊ चव्हाण, व्यापारी असोसिएशनचे किशोर हेंद्रे, शिवदास डोईफोडे, राजेंद्र भिसे, दीपक डागा, संतोष गांधी, अॅ. उत्तम आगवणे, मनोज शहा, मनोज रावळ, बाळासाहेब मोठे, अमोल साबळे, अजय राऊत, सुनिता भादेकर, कोतवाल आप्पा लकडे यांच्यासह व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

        बुधवारी प्रभाग क्रमांक दोन मधील एक युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील १५ व्यक्तींचे कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १४ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर एकाचा रिपोर्ट प्रलंबित आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : नीरा शहरात पुढिल शनिवारी पर्यंत जनता कर्फ्यू : तीन दिवसात ४ रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांचा निर्णय
नीरा शहरात पुढिल शनिवारी पर्यंत जनता कर्फ्यू : तीन दिवसात ४ रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांचा निर्णय
https://lh3.googleusercontent.com/--6PP4hHuY18/XxxfOKbtIII/AAAAAAAADXQ/nDD6cfvRcMUTDF3OKJucjSan2wn7Z0NfwCLcBGAsYHQ/s1600/1595694902800341-0.png
https://lh3.googleusercontent.com/--6PP4hHuY18/XxxfOKbtIII/AAAAAAAADXQ/nDD6cfvRcMUTDF3OKJucjSan2wn7Z0NfwCLcBGAsYHQ/s72-c/1595694902800341-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_603.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_603.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy