निरेत अजून एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर : निरेची संख्या आठ वर तर पुरंदर तालुक्याची ४७५ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरीसह निरा मध्ये ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. आज दि.२८ रोजी पुन्हा सकाळी आलेल्या अहवालानुसार निरा व जेजुरी येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७५ झाली आहे
जेजुरी येथील एक व नीरा येथील एक असे दोन खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती पुरंदर च्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. काल निरा येथील बारामती रोड वरील एकाच कुटुंबातील तीन पॉझिटिव्ह रुग्ण आले होते त्यांच्या कुटुंबातील एका युवकाचा आज पुरणा वोल पॉझिटिव आला आहे. त्यामुळे निरेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ झाली आहे.
COMMENTS