कृषी पदवीधर संघटनेच्या बारामती तालुका कार्याध्यक्षपदी आप्पा लाला भिसे यांची निवड
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
कृषी पदवीधर संघटनेच्या बारामती तालुका कार्याध्यक्षपदी आप्पा लाला भिसे रा. होळ ता. बारामती यांची निवड करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुण्यात एक बैठक पार पडली यामध्ये भिसे यांच्यावर बारामती तालुक्यातील जबाबदारी देण्यात आली. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे आणि अधुनीक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात संघटनेचे सदस्य कार्यक्षम असतात, जिल्ह्यातील पदवीधर युवक विद्यार्थी आणि शेतकरी यांच्याकडील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगीतले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरज खोमणे, प्रदेश उपाध्यक्ष मनीष भदाणे पाटील, महासचिव प्रकाश यादव, पुणे जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष गणेश कायगुडे पाटील उपस्थित होते.
-----------------
COMMENTS