बारामतीत आज ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज तपासणी करण्यात आलेल्या ६४ रुग्णांपैकी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ६९ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी एकूण ६४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या अहवालां पैकी बारामती शहरातील दोन व व भिकोबा नगर येथील एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत बारामती शहरांमध्ये ६६ वर्षीय बागवान वस्ती जळोची येथील पुरुषाचा तसेच आमराई परिसरातील ६४ वर्षीय इसमाचा व भिकोबा नगर येथील यापूर्वी पॉझिटिव असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा (५४ वर्षे) अहवाल पॉझिटिव आलेला आहे असे एकूण ६४ पैकी आज बारामती मध्ये ७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत
COMMENTS