बारामती ग्रामीण पोलिसांची ११ दारू विक्रेत्यांवर कारवाई : १ लाख ३१ हजारांचा माल जप्त
सांगवी : प्रतिनिधी
बारामती ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या एकुण ११ दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १ लाख ३१ हजार ८१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हृददीत आठवडा भरात अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आरोपी शुभम संजय शिंदे ( रा. पारवडी ता. बारामती ), आलका रामचंद्र दुबळे ( रा. तांदुळवाडी ता. बारामती), गिताबाईं अशोक अडागळे ( रा. तादुंळवाडी ता. बारामती ), चेतन बाळू जाधव (रा. माळेगाव ता. बारामती), रोहिदास रामदास मदने (रा. धाटगेवाडी ता. बारामती), नाना कुंडलीक सोनवणे (रा. झारगरवाडी ता. बारामती ), आकाश दादासाहेब देवकाते (रा. निरावागज ता. बारामती), वसंत दत्तात्रय गोफणे (रा.सोनगाव ता. बारामती ), विजय जनार्दन पवार ( रा.माळेगाव बु ता. बारामती), बाळासाहेब अनिल सावंत ( रा.माळेगाव बु ता.बारामती ),दीपाली विजय भिसे ( रा. कटफळ ता. बारामती ) यांना अटक करून त्यांच्याकडून १३३ लिटर गावठी दारू, ५ लिटर देशी विदेशी दारू तसेच गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ३१ हजार ८१३ रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विकेत्यांवर तडीपारी अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असणाऱ्या दारू विक्रेत्यांची माहिती देऊन माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक घोलप यांनी केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टाफने केली आहे.
COMMENTS