पुरंदर तालुका कोरोना पॉझिटिव्ह @ १६७.. आज दिवसभरात ११ रुग्णांची भर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही. सासवडसह आता जेजुरी व पुरंदरच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. आज गुरुवार दि.९ जुलै दुपारी आलेल्या अहवालानुसार ११ रुग्णांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यात आज सासवड येथून पाठविण्यात आलेले १९ पैकी ६, जेजुरी येथील २५ पैकी ५ असे एकूण ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी येथील १ हायरिस्क कॉन्टॅक्ट, सोनोरी येथील १ नवीन, सासवड येथील २ नवीन, ३ हाय रिस्क कॉन्टॅक्ट, वाघापूर येथील २, बेलसर येथील १, वनपुरी येथिल १, सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत.
आता सावधगिरी बाळगणे आवश्यक -
कोरोनाने तालुक्यात दीडशेचा आकडा ओलांडला असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ५० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS