वाणेवाडीतील अवैद्य दारुविक्री बंद करण्याची ग्रामपंचायतीची मागणी : अप्पर पोलिस अधिक्षक यांच्याकडे दिला तक्रारी अर्ज
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती) ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील अवैद्य दारु विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी थेट बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
वाणेवाडी गावच्या हद्दीतील निरा डाव्या कालव्याशेजारी मोठ्या प्रमाणात अवैद्य दारु विक्री केली जात असून शेतात जाणारे शेतकरी, मजूर महिला तसेच रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावच्या हद्दीतील स्मशानभूमी, गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आणि फाटा क्रमांक सहा याठीकाणी हा व्यवसाय खुलेआम सुरु असून हा व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, आणि ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत वडगाव पोलिसांनी अवैद्य धंद्यावर कारवाई केली आहे. मात्र पुन्हा काही दिवसांनी हे अवैद्य धंदे सुरु होत असल्याने ग्रामपंचायतीने थेट अप्पर पोलिस अधिक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
मद्यपी दारू पिवून अनेकदा रस्त्यावरच बसत असतात याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. येथील सिनेमा चौक तर मद्यपींचा अड्डाच बनला आहे.याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीखाली दिवसभर मद्यपींचा टिय्या असतो. कारखाना परीसरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून येथील अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याची मागणी करत थेट अप्पर पोलिस अधिक्षकांकडेच कारवाई करण्याची मागणी केली आहे.
COMMENTS