पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या @ ६७१ तर २७ मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
काल दि. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील एक व्यक्ती पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोनाने मृत झाले आहेत. तर जेजुरीच्या विद्यानगर परिसरात एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७१ तर मृत्यूंची संख्या २७ झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रुग्ण पुरुष, वय वर्षे ५७, पुणे येथे उपचार घेत होते. आज मयत झालेत. तसेच जेजुरी येथील एका व्यक्तीचा खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे..
COMMENTS