सोमेश्वरनगर येथे जुगार अड्यावर छापा : २८९८० मुद्देमालासह सात जण ताब्यात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाले गुप्त बातमीवरुन, वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे हददीत करंजेपुल कारखाना रोड येथे अशोक लोंढे हा त्याचे पराचे पुर्वेस कॅनालचे कडेला झाडाखाली काही इसमांना घेवुन बेकायदा बिगरपरवाना पैशावर जुगार खेळत आहे. अशी बातमी मिळालेने सदर ठिकाणी छापा टाकला असता अशोक लोंढे याचेसह एकूण ७ इसम, रोख रक्कम, व जुगाराचे साहीत्य असे एकूण २८,९८० रुपयेचा मुददेमाल व आरोपी मिळून आले.
सदर आरोपींविरुध्द वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेस जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदयाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते
यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे आधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोउनि संदीप
गोसावी, पो.हवा. सुरेश भोई, तानाजी गावडे, पो.ना रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, पो.कॉ.गोसावी यांनी केलेली आहे.
COMMENTS