अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न

Pune Reporter

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न 

बारामती प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती महोत्सवानिमित्त औचित्य साधून व  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबीर लहुजी शक्ती सेना व चंद्रकांत सावंत मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 27 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.   


यावेळी नगरसेविका मयुरी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरज शिंदे, चंद्रकांत खंडाळे, माजी नगरसेवक विजय खरात, पपू भिसे, माउली दुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शिबीर यशस्वी होण्यासाठी, आयोजक  चंद्रकांत सावंत, शक्ती भंडारे,  जालिंदर उगाडेयशवंत अवघडेश्रीकांत पाथरकर, दिनेश सोनवणे ,शुभम भिसे, कुणाल लांडगेविजय मोरेअविनाश दुर्वे, गणेश अवघडे, सनी अवघडे, संतोष जगताप यांनी परिश्रम घेतले.

To Top