बारामतीत आज ५६ जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काल घेतलेले एकूण rt-pcr नमुने १३९ पैकी शहरातील १९ व ग्रामीण भागातील १८ एकूण ३७ जणांचा तर खाजगी एंटीजेन नमुने ७६ घेण्यात आले, त्यापैकी ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील ६ असे १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज एकूण पॉझिटिव्ह रुणांची संख्खा ५६ झाली आहे.
त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या ९०१ वर गेली आहे. काल दिवसभरातील मृत्यू शहरातील तीन ग्रामीण भागातील एक ,बारामतीचे एकूण मृत्यू ३९ वर गेली आहेपॉझिटिव आलेल्यांचे पत्ते खालीलप्रमाणे-- पिंपळी बारामती पाच रुग्ण, पणदरे पाच रुग्ण, वाणेवाडी एक रुग्ण, कोराळे बुद्रुक एक रुग्ण,गुणवडी एक रुग्ण, माळेगाव येथील तीन रुग्ण, करंजेपुल एक रुग्ण, ढाकाळे येथील दोन रुग्ण तसेच शहरांमधील अमराई दोन रुग्ण, तांबे नगर एक रुग्ण, हरिकृपा नगर एक रुग्ण,कृषी देवता नगर एक रुग्ण, बुरुड गल्ली दोन रुग्ण, सातव नगर बारामती येथील 2 रुग्ण, कसबा बारामती येथील 3 रुग्ण, विद्यानगर बारामतीतील एक रुग्ण, संभाजीनगर येथील एक रुग्ण, पान गल्ली येथील दोन रुग्ण, रुई येथील एक रुग्ण व बारामती येथील एका रुग्णाचा समावेश आहे
COMMENTS