वाणेवाडी पुढील तीन दिवस लॉकडाउन : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल ने तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच वाणेवाडी ग्रामपंचायतीने पुढील तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमेश्वरनगर परिसरातील सोमेश्वरनगर, मुरूम,वाणेवाडी, निंबुत गावातील बाजारपेठा बंद ठेवण्याची मागणी होत आहे. सोमेश्वरनगर परिसरातील करंजेपुल, वाणेवाडी आणि निंबुत या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सोमेश्वरनगर परिसरातील गावे बंद ठेवण्याची मागणी होत आहे.
करंजेपुल ७ वानेवाडी ६ आणि निंबुत ला ३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून गावे बंद ठेवण्याची मागणी होत आहे. करंजेपुल ग्रामपंचायतीने काल पासूनच पुढील तीन दिवस गाव बंद केले आहे.
करंजेपुल ग्रामपंचायत ने 3 दिवस बाजारपेठ बंद ठेवली. मात्र फक्त करंजेपुल ने बंद ठेवून काही होणार नाही . त्यासाठी सोमेश्वर परिसरातील सर्व ग्रामपंचायत निंबुत , वाघळवाडी , करंजेपुल , करंजे , सोरटे वाडी , वाणेवाडी व मुरूम या सर्वांनी समन्वय साधून आठवड्यातून लागोपाठ दोन दिवस , कडकडीत बंद राबवणे गरजेचे वाटते . या दोन दिवसात अत्यावश्यक मधील अत्यावश्यकच गोष्टी गोष्टी चालू राहाव्यात (मेडिकल व दवाखाने फक्त) ....हे फक्त पुढील एक पुढील दोन महिने (महिन्यातून ८ दिवस) राबवल तर सोमेश्वर परिसरातील कोरोना साखळी तोडण्यास मदत होईल
COMMENTS