बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय मुग व उडीद खरेदी केंद्रासाठी नाव नोंदणी सुरू
बारामती : प्रतिनिधी
हंगाम २०२०-२०२१ मधील किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमीभावाने मुग व उडीद खरेदीसाठी दि. १५/९/२०२० पासुन नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील मुग व उडीद उत्पादक शेतक-यांनी आपला शेतमाल नोंदणी झालेनंतर स्वच्छ व
चांगला वाळवुन आणावा. तरी मुग व उडीद उत्पादक शेतक-यांनी सदर केंद्राचा फायदा घ्यावा असे बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी आवाहन केले.
शेतक-यांनी नाव नोंदणी साठी मुग व उडीद पिकाची नोंद असलेल्या ७/१२ उतारा,
आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स इ. आवश्यक कागदपत्रे आणुन निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती
चौक बारामती येथे प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी. मुग हमीभाव रू. ७१९६/- प्रति क्विटल
आणि उडीद हमीभाव रू. ६०००/- प्रति क्विटल दर असल्याने शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा
अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
COMMENTS