कृषीकन्या काजल लव्हटे देत आहे माती परीक्षणचे धडे
भोर : प्रतिनिधी माणिक पवार
महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत राबवण्यात येणारया ग्रामिण कृषि जागृकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय कराड ( जि. सातारा ) येथील कृषिकन्या काजल शिवाजी लव्हटे ही नसरापूर ( ता.भोर ) येथील शेतकऱ्यांना जमिनीच्याबाबत मार्गदर्शन करत असून शेतकऱ्यांना माती परिक्षणचे धडे देत आहे.
कराड कृषि महाविद्यालयातील विद्यार्थीनी काजल लव्हटे कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी नसरापूर व परिसरातील शेतकरयांबरोबर संवाद साधत आहे येथील कृष्णा सोपान फडतरे व अन्य शेतकरयांच्या शेतावर भेट देऊन पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता गरजेची आहे. माती परिक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजण्यास मदत होते व त्या नुसार पिकांसाठी खताच्या मात्रा ठरवणे सुलभ होते यासाठी सर्व शेतकरयांनी माती परिक्षण करणे गरजेचे असल्याची माहीती कृषीकन्या काजल यांनी शेतकरयांना देत आहे.
बीजप्रक्रीया ,जनावरांचे लसीकरण,बोर्डो मिश्रण प्रक्रिया,निंबोळी अर्क प्रक्रीया,सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या मतरतेची लक्षणे,तसेच अधनिक शेतीसाठी शेती अँपचे महत्व इत्यादींची माहीती देऊन प्रत्याक्षिकांसह शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमासाठी कृषी महाविद्याल कराडचे सहयोगी अधिष्ठाता आर आर सुर्यवंशी,कार्यक्रम समन्वयक डॉ डी एस नावडकर,डॉ आय ए घोनमोडे,डॉ ए एम चवई यांनी काजल हिला मार्गदर्शन लाभले आहे.
COMMENTS