बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्र्यांच्या 'सहयोग' समोर मराठा समाजाचे 'ढोल बाजाओ'
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. शनिवारी दि २६ सकाळी ९ ते ११ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर “ढोल बजाओ’ आंदोलन केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केली गेली. यामध्ये राज्य शासनावर सर्वाधिक रोष असून त्यातूनच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार खासदार यांच्या निवासस्थानासमोर राज्यभरात आंदोलने झाली. याचाच एक भाग म्हणून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानासमोर बारामती शहर व तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांकडून ढोल वाजवून आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन करताना पोलीस प्रशासनाचे नियम, करोनाच्या दृष्टीने आवश्यक सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे याबाबी पाळणे बंधनकारक असल्याचे या बाबतच्या आवाहनात नमूद केले आहे.
COMMENTS