नियमांचे पालन करून कोरोनावर मात करण्याची गरज : आरोग्य सभापती प्रमोद काकडे

Admin
नियमांचे पालन करून कोरोनावर मात करण्याची गरज : आरोग्य सभापती प्रमोद काकडे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे लक्षात घेऊन व शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन  करून निंबुत मधील लोकांनी कोरोना सारख्या आजारावर मात केली पाहिजे. असे मत पुणे जिल्हा परिषदचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती  प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले. 
       निंबुत ता बारामती  येथे आज  सर्व शासकीय नियमांचे पालन करून, सोशल डिस्टंसिंग राखून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप, सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले तसेच गरजू लोकांना पिठाच्या चक्की चे व शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.. या सर्व वस्तूंचे वाटप पुणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निंबुत यांच्या माध्यमातून करण्यात आले.
       कोरोना च्या  पार्श्वभूमीवर विद्यार्थी  अभ्यासापासून वंचित राहू नयेत व अगदी गरीब विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन शिक्षण योग्य प्रकारे मिळावे म्हणून निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने टॅब चे वितरण करण्यात आले. या सर्व वस्तूंचे वितरण, पुणे जिल्हा परिषद पुणे, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती,  प्रमोद काकडे तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  शहाजी काकडे  निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष  सतीश काकडे  सरपंच राजकुमार बनसोडे ,नीरा ग्रामपंचायत चे माजी सरपंच चंद्रराव धायगुडे, निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक भीमराव बनसोडे तसेच मानद सचिव मदनराव काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका .दिपाली ननावरे यांच्या हस्ते झाले.. यावेळी ग्रामस्थ, आशा सेविका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठानचे मानद सचिव  मदनराव काकडे  यांनी केले. सूत्रसंचालन आर एस भगत  यांनी केले व आभार एस व्ही सूर्यवंशी  यांनी मानले.
To Top