कर्जाचे हप्ते थांबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी उद्या करणार राजव्यापी आंदोलन

Admin
कर्जाचे हप्ते थांबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी उद्या करणार राजव्यापी आंदोलन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी


संपूर्ण जग आज कोरोना या महामारीने त्रस्त झाले असताना आणि #who ने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केले आहे. असे असताना आज महाराष्ट्रातील माता भगिनींना एका वेगळ्याच संकटाने ग्रासले आहे ते संकट म्हणजे #मायक्रो फायनान्स चे हप्ते कशे भरायचे , म्हणूनच बहुजन मुक्ती पार्टी ने राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे . 
               केंद्र सरकारने ज्यापद्धतीने मोठ - मोठ्या उद्योगपतींचे २८ हजार कोटींचे कर्ज माफ केले त्यापद्धतीने या सामान्य वर्गातील महिलांचे कर्ज माफ करावे आणि जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत फायनान्सची कर्ज वसुली थांबविण्यात यावी म्हणून उद्या दि २३ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत राज्यव्यापी  धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . त्या आंदोलनाचे निवेदन  वडगाव निंबाळकर चे सपोनि सोमनाथ लांडे सुपूर्त करण्यात आले.  यावेळी संतोष भिसे , भाऊसो हुंबरे , दीपक दणाने , विकास शेंडगे उपस्थित होते
To Top