मुरूम ३ वाणेवाडी १ सोरटेवाडी १ वाकी १ सह ग्रामीण बारामतीत ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
मुरूम ३ वाणेवाडी १ सोरटेवाडी १ वाकी १ सह ग्रामीण बारामतीत ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

गेल्या चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु रविवारी संपला. सगळे व्यवहार सुरू होताच बारामतीत पुन्हा कोरिना रुग्णांची संख्या वाढली आहे. आज तब्बल ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ४९ जणांचा समावेश आहे. आज शहरापेक्षा ग्रामीण भागातील बधितांचा आकडा जास्त असून कालच्या तुलनेत कोरोना बधितांचा आकडा ४४ ने वाढला आहे. 

दि. २०  रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तसेच काल दि २१ चे एकूण rt-pcr नमुने १८२
  एकूण पॉझिटिव्ह- ४१. 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६         
कालचे एकूण एंटीजन १४४.         
 एकूण पॉझिटिव्ह-४१ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ८२  
 शहर- ३३।  ग्रामीण- ४९             
एकूण रूग्णसंख्या-२७१७              
 एकूण बरे झालेले रुग्ण- १५०५        
एकूण मृत्यू-- ६८
To Top