नवरा बायकोच्या भांडणात बायकोचा मृत्यू : पुरंदर तालुक्यातील निरा येथील घटना

Admin
नवरा बायकोच्या भांडणात बायकोचा मृत्यू : पुरंदर तालुक्यातील निरा येथील घटना

पुरंदर :  प्रतिनिधी
       
पुरंदर तालुक्यातील निरा येथील वृद्ध दांपत्याच्या भांडणात महिला गंभीर जखमी झालेल्याने मृत्यु झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी महिला आपल्या घरात रक्तबंभाळ अवस्थेत मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना संशय आला. निरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सविस्तर माहिती घेत आहेत.
         निरा वार्ड नं ६ मधिल बुवासाहेब चौक येथील पठाण कुटुंबातील जेष्ठ महिला जमेला दस्तगीर पठाण वय ५५ वर्षे यांच्या डोक्यात लाकडी बॅटने घाव घातल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पोलीसांना समजली. नवरा बायकोच्या किरकोळ भांडणातून सदर घटना घडलेली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले. पती दस्तगीर सिकंदर पठाण वय ६० वर्षे यांनीच बॅटने घाव घातल्याची चर्चा सकाळपासून सुरु आहे. 
           मयत जमेला दस्तगीर पठाण वय ५५ वर्ष यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठवला असून निरा-जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहेत. जेजुरी पोलीसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सामजते.
To Top