सुप्यात जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र शुकशुकाट :
सुपेकर आणि व्यापाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसात
सुपे : प्रतिनिधी दीपक जाधव
बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वच गावातुन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संखेनुसार सात दिवसाचा जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्यात जनता कर्फ्यू अधिक तीव्र करण्यात आला आहे. मंगळवारी ( दि. ०८ ) सुपे बसस्थानकावरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
तालुक्यात ठिकठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जनता कर्फ्यू अधिकच गडद केला आहे. त्यानुसार सुपे ग्रामपंचायतीच्यावतीने संपुर्ण गावात ध्वनिक्षेपकाद्वारे सात दिवस गाव बंद ठेवण्यात येणार असल्याची दवंडी देण्यात आल्याची माहिती सरपंच स्वाती हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली.
तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर सुप्यात सोमवार ( दि. ०७ ) पासुन जनता कर्फ्यू राबवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ बंद केल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. येथील बसस्थानक आवारात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. तर सुपे येथे जनता कर्फ्यू असल्याने बाजार समितीचे संपुर्ण धान्य आणि लिंबाचे बाजार बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब पोमणे यांनी दिली.
दरम्यान सुपे पोलिस चौकीअंतर्गत परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांकडुन पोलिसांनी दोन दिवसात सुमारे ३० ते ३५ जणांवर कारवाई करुन दंड वसुल करण्यात आल्याची माहिती येथील पोलिस चौकीचे हवालदार म्हेत्रे व ताडगे यांनी दिली.
COMMENTS