उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवाहन
बारामती दि.9 :-
बारामती शहर व ग्रामीण भाग हा दिनांक 7 ते 13 सप्टेंबर 2020 पर्यंत कोरोना अवरोधासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे बारामती शहर व ग्रामीण भागातील खाजगी वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून ) वाहतूकीसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या या कार्यालयातील कामकाजाकरीता जसे (अनुज्ञप्ती चाचणी , वाहन नोंदणी , वाहन हस्तांतरण व इतर कामे )पुर्वनियोजित अपॉईमेंट असून देखील उपस्थित राहणे शक्य होणार नाही . या प्रतिबंधित कालावधीतल कामकाजासाठी जरी पुर्वनियोजित अपाँईटमेंट घेतलेल्या असल्या तरी सदर कामकाज हे हा कालावधी संपल्यानंतर कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन रिशेड्यूल करून घ्याव्यात. शिकाऊ अनुज्ञप्तीकरीता अपॉईमेंट ऑनलाईन पध्दतीनेच रिशेड्यूल करणे आवश्यक आहे.
चारचाकी वाहनांसाठी एमएच 42 बीबी ही मालिका सुरू करण्यासाठी दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी अर्ज मागविण्यात आले होते. सदर मालिकेचे एकाच क्रमांकासाठी दोन पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांक लिलावाचे कामकाज देखील सदर प्रतिबंधित कालवधी संपल्यानंतर नव्याने जाहिर केलेल्या तारखेस करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , बारामती यांनी कळविले आहे.
COMMENTS