ऍक्टिव्ह सर्व्हे मुरूमचा...पॉझिटिव्ह रुग्ण सापडले वाणेवाडीचे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज मुरूम या ठिकाणी ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अंतर्गत कोरोना तपासणी करण्यात आली. मात्र या सर्व्हेत मुरूम गावातील एकही रुग्ण सापडला नसून वानेवाडी चे चार तर मागरवाडीचा एक असे पाच रुग्ण सापडले.
गेल्या दोन दिवसांपासून वाणेवाडी आणि मुरूम या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी नागरिकांच्या कोरोना तपासण्या सुरू आहेत. काल वाणेवाडी गावातील १०९५ कुटुंबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६२ संशयित आढळून आले यापैकी ११ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या अकरा पैकी चार जण बाहेरील गावातील होते तर आज मुरूम या ठिकाणी ११०५ कुटुंबातील ५६४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ संशयित आढळुन आले, पैकी ५ जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र या पाचही जणांपैकी एकही रुग्ण मुरूम गावातील नसून चार वाणेवाडी तर एक रुग्ण मागरवाडीचा आढळून आला आहे. आरोग्य विभागाच्या एकूण २६ टीमने ही तपासणी पूर्ण केली
COMMENTS