गुढी उभारून पुणे जिल्ह्यातून कोरोना जाणार का? : जिल्हा परिषद तर्फे गुढी महोत्सवाचे आयोजन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेने रविवारी (दि ११) रोजी गुढी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये ग्रामपंचायतच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी ग्रामपंचायत नाही अश्या ठिकाणी वाड्या वस्त्या, शाळा आणि अंगणवाडी या ठिकाणी गुढी उभारण्यास सांगितले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी हे पत्रक काढले असून माझे कुटुंब माझी जबाबदारी च्या अनुषघाने रविवारी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत गुढी उभारण्यात यावी असे पत्रकाद्वारे कळविले आहे. यामध्ये गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, कृषी स हा य्य क व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंद करण्यास सांगितले आहे.
पत्रकामध्ये पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे . त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे . सदरच्या रुगणामुळे आपत्ती जनक परिस्थिती पुणे जिल्ह्यात उद्भवू नये. यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. असे म्हणण्यात आले आहे.
तसेच पंधरा म्हणी नमूद करण्यात आल्या असून स्थानिक पातळीवर सोईनुसार म्हणी घ्याव्यात. गुढी उभारली नंतर त्याचे वाट्स अप आणि फेसबुक पेज आणि ड्रोन कॅमेराद्वारे चित्रिकरण गुढी महोत्सवाचे करण्यास सांगितले आहे.
या गुढी महोत्सवा च्या आयोजना मुळे पुणे जिल्ह्यातून हद्दपार होणार का ? की प्रसासन व आरोग्य विभाग करत असलेल्या उपाय योजना मुळे कोरोना रोकता येणार हे गुढी उभारन्या नंतरच समजू शकेल.
COMMENTS