जिल्हा बँकेच्या वेळेत बदल : वाचा सविस्तर किती वेळ बँक राहणार चालू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँकेने आपल्या वेळेत बदल केला असून दि १५ पासून जिल्हा बँकेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखा सकाळी १० ते ५.३० या वेळेत सुरू राहणार आहेत.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकात म्हनटले आहे की, कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगामुळे देशभरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव बँकेने सर्व झोनल ऑफिस/शाखा कार्यालयीन कामकाज वेळेत बदल केलेला होता. शासनाने देशामधील तसेच राज्यामधील लॉकडाऊन शिथिल करुन प्रतिबंधित क्षेत्रातीलही निबंध हटवले आहेत. ही बाब विचारात घेता बैंकच्या सर्व झोनल ऑफिस/शाखा कार्यालयीन कामकाज वेळेत गुरुवार दि.१५.१०.२०२० रोजी पासून पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
यामध्ये झोनल ऑफिस दैनंदिन कार्यालयीन कामकाज वेळ सकाळी १०.०० ते सांय ५.३० वा. पर्यत
राहील तसेच जेवणाची सुट्टी दुपारी १.३० ते दुपारी २.०० वा. पर्यंत राहील असे पत्रकात म्हनटले आहे.
COMMENTS