करंजेपुल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील तुषार बाळू काळे वय १९ याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सासरवाडीतील लोकांशी भांडणे झाल्याने त्यातून ही आत्महत्या झाल्याचे समजत आहे. काल सायंकाळीच्या वेळी तुषार ने करंजेपुल येथील राहत्या घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला वाघळवाडी येथील सोमेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काशीनाथ नगराळे करत आहेत.
COMMENTS