ज्योतिबा सोसायटीच्या सभासदांना १० टक्के बोनस
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (मळशी) ता बारामती येथील ज्योतिबा वि का सोसायटीची नुकतीच संचालक मंडळाची सभा पार पडली, यामध्ये सभासदांना १० टक्के बोनस देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.
येत्या दोन दिवसात हा बोनस वाटप करण्यात येणार असून त्या बरोबर दिवाळी भेट म्हणून मिठाई वाटप करण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची मिठाई नंतर दिली जाणार आहे. तसेच सन २०२१ या वर्षी संस्थेस २५ वर्ष पूर्ण होत असून संस्थेचा रौप्यमोहत्सव साजरा करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्यावेळी देखील सभासदांना चांगली भेटवस्तू भेट दिली जाणार आहे. सभेत संस्थेचे सचिव धन्यकुमार जगताप बारामती व इंदापूर तालुका को ऑफ सुरवायझीग युनियन सचिवांच्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्योतिबा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
COMMENTS