अक्षय शिंदे फाऊंडेशन च्या वतीने ५६७ कामगारांना दिवाळीचा किराणा वाटप

Admin
 अक्षय शिंदे फाऊंडेशन च्या वतीने ५६७ कामगारांना दिवाळीचा किराणा वाटप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील अक्षय शिंदे फाऊंडेशन च्या वतीने बालाजी मशरूम मधील ५६७ कामगारांना दिवाळी निमित्त किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. 
            यावेळी अक्षय शिंदे फाऊंडेशन चे अध्यक्ष आर. एन. शिंदे, सचिव संजय शिंदे, सदस्य संतोष शेंडकर, महेश जगताप, योगेश सोळस्कर, राजेंद्र बालगुडे, बाबूलाल पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. अक्षय शिंदे फाऊंडेशन गेली पाच वर्षे या कामगारांना दिवाळीसाठी किराणा साहित्य वाटप करत आहेत. आज फाऊंडेशन चे अध्यक्ष आर एन शिंदे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. ५६७ कामगारांना २२०० रुपयांप्रमाणे १२ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. आता पर्यंत अक्षय शिंदे फाऊंडेशन च्या माध्यमातून अंगणवाडी इमारत, बसस्टॉप, मुलांना टॅब, माध्यमिक विद्यार्थीना सायकली वाटप, अंगणवाडीना गॅस, शैक्षणिक मदत केली आहे.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूलाल पडवळ यांनी केले तर आभार योगेश यादव यांनी मानले
To Top