अंगणवाडी सेविकेला मारहाण, एकावर गुन्हा दाखल ; कोऱ्हाळे खु ! येथील घटना

Admin
अंगणवाडी सेविकेला मारहाण, एकावर गुन्हा दाखल ; कोऱ्हाळे खु ! येथील घटना

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जा असे सांगितले म्हणून एकाने अंगणवाडी सेविकेला लाथाबुक्यांनी मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. 
         याबाबत हौसाबाई उत्तम आटोळे (वय – 52)  रा.को-हाळे खुर्द ता.बारामती जि.पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी  धनंजय खंडु खोमणे  रा.को-हाळे खुर्द ता.बारामती जि.पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  को-हाळे खुर्द  ता बारामती जि पुणे गावचे हद्दीत अंगणवाडी समोरील रोडवर फिर्यादी या अंगणवाडीचा आलेला पोषण आहार मुलांना वाटप करायचा आहे तुम्ही घेवुन जा असे सांगत असताना यातील आरोपीत याने तेथे येवुन फिर्यादीस तु लोकांना घरी जावुन सांग  रस्त्यात आम्हाला  काय सांगते असे म्हणुन शिवीगाळ करुन हाताने धक्का मारुन ढकलुन देवुन खाली पाडुन लाथा बुक्यांनी  मारहान करुन मनगटावर बुक्की मारुन हाड फँक्रचर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास  पो हवा पाटमास करत आहेत.
To Top