करंजेपुलच्या भर चौकातुन मोटारसायकल चोरी : चोर सीसीटीव्हीत कैद
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल येथील भर चौकातुन एका परप्रांतीय चोरट्याने मोटारसायकल चोरी केली . अतिशय चालाकीने या चोरट्याने मोटारसायकल चोरुन नेली. सदर चोरटा संशय येवु नये म्हणून दुसऱ्या मोटारसायकल वर आला. आपली गाडी निरा बारामती रस्त्याला लावली. तेथून सभोवतालचा अंदाज घेत चोरट्या पावलानी गाडी कडे गेला सुमारे तीन चार मिनिट ईकडे तिकडे पाहुन त्याने आपल्याकडील डुप्लीकेट चावी लावुन गाडी चालु करुन आपल्या शिवशक्ती सिमेंट या दुकानाकडे घेवुन गेला.विक्रम देवासी असे गाडी चोरणार्या व्यक्तीचे नाव आहे . सुरुवातीला त्याने आपल्याला काही माहीत नाही असा अविर्भाव केला.करंजेपुल पोलीस बोराडे यानी वडगाव निंबाळकर पोलीस चे स पो नि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सी सी टी व्ही फुटेज पाहुन चोरटा ओळखला पोलीसांचा पट्टा पडताच त्याने लपवलेली गाडी आणुन दिली याबाबत सरस्वती गायकवाड कॉर्नर येथील स्वीट होमचे मालक मदन मोटाराम देवासी यानी तक्रार दाखल केली असुन अद्याप सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला नाही .
या अगोदर या परिसरात अनेक परप्रांतीय लोकांवर शेतकरी वर्गाच्या मोटारी व ट्रांस्फार्मर चोरीचे गुन्हे दाखल आहेत . सदर लोक भंगार व्यवसाय करीत होते .ऱात्री अपरात्री हे भंगार व्यवसायीक आलेल्या मालाची विल्हेवाट लावत होते कारखाना चालु झाल्याने कारखान्याच्या कामानिमित्त अनेक अनोळखी लोक येतात त्यामुळे चोरीच्या घटना साठी करंजेपुल चौकीत पोलीस संख्या वाढवणे गरजेचे आहे .