शिंदेवाडीमध्ये वाघजाईमाता परिवर्तन पॅनलची प्रचारात आघाडी
भोर : प्रतिनिधी
पुणे - सातारा महामार्गावरील भोर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिंदेवाडी ( ता. ) ग्रामपंचायत येथील निवडणुकमध्ये अटीतटीचा सामना रंगला असून श्री वाघजाईमाता परिवर्तन पॅनलमध्ये आणि माऊली पाणलोट पॅनलमध्ये लढत होत असून प्रचारात वाघजाई माता परिवर्तनने आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी संपर्क साधून संपूर्ण गावात आज महिला व ग्रामस्थांनी रँली काढून मतदारांशी संपर्क साधला.
शिंदेवाडीमध्ये सर्जेराव शिंदे, पांडुरंग चौधरी, लक्ष्मण आप्पा शिंदे, सोमनाथ सोमाणी, सदाशिव शिंदे, ज्ञानेश्वर गोगावले, तुकाराम गोगवले, बाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री वाघजाईमाता परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. वार्ड तीनमधून माऊली पाणलोट पॅनेलच्या एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. प्रचारात श्री वाघजाई माता परिवर्तनने आघाडी घेतली असून वार्ड क्रमांक एकचे उमेदवार प्रवीण रोहिदास शिंदे, रेखा रामचंद्र गोसावी, रोहिणी मारुती गोगावले, वार्ड क्रमांक दोनचे उमेदवार अभिजित दत्तात्रय शिंदे, अरविंद पंढरीनाथ शिंदे, वैशाली पांडुरंग चौधरी, वॉर्ड क्रमांक तीनचे उमेदवार किरण दत्तात्रय गोसावी, काजल हनुमंत शिंदे यांनी गावातील सर्वच भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना प्रचारपत्रके व परिचयपत्रके दिली. वाघजाईमाता परिवर्तनच्या चिन्हांचे फलक महिला व ग्रामस्थांनी हातात शिंदेवाडी गावामध्ये मोठ्या संख्येने रँली काढली त्यास नागरीकांनी प्रतिसाद दिला.
शिंदेवाडी हे पुणे शहरालगत असल्याने गाव शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे गावचा नियोजनपुर्वक विकास होणे गरजेचे असून शिंदेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा, मुख्य रस्त्यासह छोटे छोटे रस्ते, कचरा, पिण्याचे पाणी व्यवस्थापन ड्रेनेज व्यवस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या वाघजाई माता परिवर्तनच्या वतीने प्राधाऩ्य देण्यात येणार आहे, यासाठी येथील मतदार आम्हाला निश्चित आशिर्वाद देतील असा विश्वास पांडुरंग चौधरी, सोमनाथ सोमाणी, लक्ष्मण अप्पा शिंदे यांनी व्यक्त केला.
Adv.-----------
COMMENTS