नीरा ....सत्ताधारी पॅनेल ला धक्का : माजी सरपंच राजेश काकडे गटाचे निर्विवाद वर्चस्व
पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायती असलेल्या नीरा शिवतक्रार गावच्या निवडणूकीत १७ जागांसाठी ३९ उदमेवार उभे होते. आज दिवे येथील मतमोजणी केंद्रात मतमोजणी पारपाडली. नीर विकस आघाडीचे १० सदस्य, भैरवनाथ पँनलचे ३ तर चव्हाण पँनलचे ४ सदस्य निवडून आले आहेत. चव्हाण पँनेलचे प्रमुख व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण यांना नीरा विकास आघाडीचे प्रमुख व माजी सरपंच राजेश काकडे यांनी पराभुत केले आहे.
प्रभाग १ मधून चव्हान पँनलचे अनिल लक्ष्मणराव चव्हाण, प्रमोद बाबुराव काकडे तर नीरा विकास आघाडीच्या राधा राजु माने विजयी झाल्या आहेत. प्रभाग २ मधून नीरा विकास आघाडीचे अभिषेक भालेराव, काळे वैशाली प्रल्हाद, वाडेकर माधुरी सुजीत विजयी झाले आहेत. प्रभाग ३ मधुन चव्हाण पँनेलचे सुनील (आप्पा) लक्ष्मणराव चव्हाण व डांगे जुबीन मुनीर विजयी झाले आहेत. प्रभाग ४ मधुन राजेश अशोक काकडे, शिंदे मनिषा राहुल, तेजश्री विराज काकडे विजयी झाले आहेत. प्रभाग ५ मधून भैरवनाथ पँनलचे धायगुडे संदिप मुगुटराव, बंडगर वैशाली सुदाम, जावळे वर्षा संदिप विजयी झाले आहेत. प्रभाग ६ मधुन नीरा विकास आघाडीच्या काकडे सारिका दिपक, शिंदे अनंता नारायण, प्रियंका सागर झुंजूरके विजयी झाले आहेत.
COMMENTS