माहूर येथे चिंकारा जातीच्या हरणाला जीवदान

Admin
माहूर येथे चिंकारा जातीच्या हरणाला जीवदान

परींचे : प्रतिनिधी

माहूर (ता. पुरंदर) येथे चिंकारा जातींचे 3 वर्ष वयाचे नर हरीण कुत्रांच्या हल्यात जखमी अवस्थेत असलेले तुकाराम जगताप यांच्या शेतात अक्षय जगताप व निलेश जगताप यांना आढळले असता त्यांनी कुत्र्यांपासून त्याचे संरक्षण केले.
त्यांनी तात्काळ पुणे जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य संदिप नवले यांना संपर्क केला असता  नवले यांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन हरणाची पाहणी केली व वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप यांच्याशी संपर्क केला. जगताप यांनी त्यांचे कर्मचारी दादा जाधव व वनपाल सस्ते यांना घटनास्थळी पाठविले. चिंकारा हरणास पशुवेद्यकीय दवाखाना परिंचे येथे प्रथमोपचार करून त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. पुढील उपचारासाठी राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज पुणे येथे पाठवण्यात आले. 
यावेळी तालुक्यात वन्य प्राणी जखमी अवस्थेत किंवा शिकार होताना आढळल्यास त्वरित वन विभाग अथवा माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हाहन पुणे जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य संदिप नवले यांनी केले.

To Top