खंडेरायाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा निर्माण होते : खा. छत्रपती संभाजीराजे
पुरंदर : प्रतिनिधी
काळ फार वाईट चाललाय, कोरोनाचे महामारीत सर्व भक्तांना विनंती की दर्शन घेताना सरकारने ज्या नियामवली घालून दिल्या आहेत त्यांचे पालन करत दर्शन घ्यावे. लग्नानंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला येण्याची परंपरा आहे. पण आम्ही दर्शनासाठी येऊ शकलो नाही. या पुर्वी मी खंडेरायाच्या दर्नासाठी आलो आहे. २४ जानेवारीला लग्नाला २५ वर्षे झाले, आम्हा दोघांना वाटल जेजूरिला दर्शनासाठी जावं, त्यामुळे सपत्निक दर्शनासाठी आलो आहे. खंडेरायाच्या दर्शनाने मसोक्त आनंद झाला आहे. खंडेरायाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा निर्माण झाली असं म्हटलं तर वावग होणार नाही, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पौंष पोर्णिमा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते खंडेरायाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी संभाजीराजे यांनी सपत्निक कुळाचार, जागरण गोंधळाचा विधी पार पाडत खंडेरायाला साकडं घातलं. लग्नाला २५ वर्षे पूर्ण होत असताना खंडेरायाच्या दर्शनाला सपत्निक येता आलं ही समाधानाची बाबत असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सध्याच्या अडचणीच्या काळात भाविकांनी गर्दी न करता अधिकाधिक काळजी घेण्याचं आवाहनही संभाजीराजे यांनी केलंय. जेजुरीत रत्नसिंह आणि अजयसिंह सावंत यांच्या सावंत खास वाड्याला सुद्धा त्यांनी यावेळी भेट दिली.
COMMENTS