खुर्चीवर नंतर बसू, आधी काम करू : नसरापूरच्या नवनिर्वाचित सदस्यांचा निर्धार
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
सरपंच, उपसरपंच होण्याची अनेकांना घाई गडबड असते, मात्र याला बगल देत खुर्चीवर नंतर बसू असा निर्धार करत नसरापूर ( ता. भोर ) येथील निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विकासकामे करण्यावर भर दिला आहे. यामुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीचे निवडून आलेल्या नसरापूर विकास पॅनलचे सदस्यांनी कामावर भर दिला असून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर होऊन आलेल्या हायमास्क विजेचे पथदिवे चेलाडीफाटा, स्वप्नलोक गेट, कामथडी रोड, राममंदिर, स्मशानभूमी, बनेश्र्वर कमान, सरकारी दवाखानासमोर अशा सात ठिकाणी बसविण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इरफान मुलानी, नामदेव चव्हाण, ग्रामस्थ रमेश कदम, संतोष हाडके, किरण शिनगारे, प्रवीण जगताप, शिपाई अक्षय सपकाळ, प्रमोद ठोंबरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, लेंडीपुलावरील कचऱ्याचे विल्हेवाट, साफसफाई व पिण्याचे पाण्याचे पाईपाचे दुरुस्ती करण्यात आली आहे.
नसरापूर ( ता. भोर ) नुकतीच झालेल्या ग्रामपंचायतीचे निवडणूक प्रक्रिया पार पडली. चुरशीच्या निवडीत नसरापूर विकास पॅनलचे इरफान मुलाणी, सपना झोरे, अश्विनी कांबळे, गणेश दळवी, उषा कदम हे विजयी झाले आहेत. तर याच पॅनलचे संदीप कदम, नामदेव चव्हाण, श्रद्धा हाडके, सुधीर वाल्हेकर, रोहिणी शेटे हे बिनविरोध निवडून आले होते.
COMMENTS