निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी तनुजा शहा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा येथील तनुजा शहा यांची निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आज पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते करणेत आला यावेळी निरा येथील सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र ह्युमड ग्रुप च्या अध्यक्षा तनुजा मनोज शहा यांची निरा शहर महिला अध्यक्षा म्हणून निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते देण्यात आले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील,मा आमदार व पुरंदर हवेली चे समन्वयक अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, मा सनदी अधिकारी संभाजी झेंडे, बबुसाहेब माहुरकर, कांचन निगडे उपस्थित होते
COMMENTS