मोढवे गावाच्या हद्दीतील खडी क्रशरवर कारवाई करा : अन्यथा २ फेब्रुवारीला उपोषण
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोढवे गावाच्या परिसरामध्ये तीन खडीमशिन राजरोसपणे चालू आहेत. खडी वाहतूक करणार्या मोठ्या गाड्यांमुळे मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत शासनाचे खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळे मोढवे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे तेथील जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळी मुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे तेथील पिकांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे तेथे होणाऱ्या स्फोटामुळे घरांना प्रचंड मोठे तडे गेले आहेत. शेता मध्ये काम करत असताना धुळीमुळे काम करणेही अवघड झाले आहे व तेथे सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे त्या मुळे आमच्या जमिनी खराब होते चालल्या आहेत आम्ही कसे जगायचे, आमचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येऊ शकते अशी भीती मोढवे ग्रामस्थ आसपासचे शेतकरी भीती वाटत आहे आम्हाला न्याय मिळावा अशी विनवणी शेतकरी करत आहेत. यासंबंधी २४ डिसेंबर रोजी बारामती तहसीलदार यांना निवेदन दिले होते. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले. मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रशासकीय भवन , प्रांत कार्यालय येथे समस्त मोढवे ग्रामस्थ यांच्यावतीने उपोषणास बसणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, संपतराव टकले, गजानन कोळपे, दशरथ कोळपे, दादासो मोटे, धोंडीबा टेंगले इत्यांदिंच्या सह्या आहेत.
COMMENTS