......तर कदाचित ते उर्वरित ९३ उमेदवारही झाले असते पात्र : सोमेश्वर कारखाना निवडणूक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकित भाजपचे दिलीप खैरे यांचा अर्ज जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी वैद्य ठरवला. खैरे यांच्यासह उर्वरित अर्ज बाद झालेले ९३ इच्छुक उमेदवार यांनी तीन दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असती तर कदाचित त्यांना सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी मिळाली असती.
१५ फेब्रुवारी रोजी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. २२ फेब्रुवारी ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती तर दि २३ रोजी छाननी होती. यामध्ये कारखान्याच्या पोटनियमाप्रमाणे सलग तीन वर्षे ऊस न आल्याच्या निकषांवर भाजपचे दिलीप खैरे यांच्यासह ९४ इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. दरम्यान दि २५ फेब्रुवारी रोजी दिलीप खैरे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत धाव घेतली होती. खैरे यांच्या याचिकेवर दि ३ मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत अखेर खैरे यांचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरवला. दिलीप खैरे यांचा उमेदवारी अर्ज पात्र झाल्याने आता भाजपला कारखाना निवडणुकीत संजीवनी मिळाली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक या पंचवार्षिक निवडणुकीत रेकॉर्डब्रेक ६३२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी ९४ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करणे बंधनकारक असते. या ९४ पैकी एकमेव भाजपचे दिलीप खैरे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याने त्यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. उर्वरित ९३ जनांनीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असती तर कदाचित ते पण सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहू शकले असते.
COMMENTS