बारामती शहरामध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई : ५२ हजारांचा दंड वसूल
बारामती : प्रतिनिधी
बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागत कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन यांचेकडून करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आज कारवाई करण्यात आली असून या सर्व १०२ नागरिकांकडून रूपये ५२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस, नगरपालिका व महसूल विभाग यांचेमार्फत करण्यात आली. या कारवाई मध्ये विनामास्क फिरणारे नागरिक , विनामास्क व्यवसाय करणारे व्यवसायिक , गर्दीच्या ठिकाणी सोशल डिंस्टसिंग न पाळणारे नागरिक यांचा सामावेश आहे. तसेच शहरामध्ये जे नागरिक कोविड पॉझिटव्ह असून देखील वैद्यकीय अधिक्षक यांची परवानगी नसताना देखील स्वत:हून घरी राहत आहेत अशा ८ रूग्णांना शहरातील बुरूड गल्ली , तांबेनगर , जामदार रोड येथून सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर , सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
COMMENTS