सोमेश्वरनगर ला 'द बर्निंग ट्रक' : उसाने भरलेला ट्रक जळून खाक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गटात उसाने भरून उभा असलेला ट्रक जळून खाक झाला.
आज दि ८ रोजी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली. या आगीत ट्रक पूर्ण जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळार्जुन येथील टेकवडे यांच्या मालकीचा हा ट्रक होता. काल सायंकाळी उसाचे भरून हा ट्रक सोमेश्वर कारखान्याच्या सोमेश्वर हायस्कूल वाहन तळावर थांबला होता. पहाटे या ट्रक ने अचानक पेट घेतला. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.
COMMENTS